Posts

अंग्रो-मइन्यु: जरथुश्त्री (पारशी)

Image
  अंग्रो-मइन्यु:   जरथुश्त्री (पारशी) धर्मग्रंथात वर्णन केलेल्या पाशवी प्रवृत्तीचे मूर्तस्वरूप म्हणजे अंग्रो-मइन्यु होय. पेहलवी भाषेत त्यास ‘अहरिमन’ अशी संज्ञा आहे. जरथुश्त्रप्रणीत  गाथेत    अंग्रो- मइन्यूचा उल्लेख आढळत नाही तथापि अन्य  अवेस्ता   प्रकरणांत हे नाव येते. अंग्रो-मइन्यु व अहुर मज्द स्पँता-मइन्यु (अहुर मज्द) ह्या दैवी प्रवृत्तीचा त्यास शत्रू मानले आहे. तो साक्षात मृत्युस्वरूपी असून जीवसृष्टीत निर्माण होणारे रोग व तदनुषंगिक घाण, सडणे कुजणे इ. प्रक्रिया घडवून आणतो. उत्तर देशा हे त्याचे निवासस्थान होय. परमात्मभक्तीची व सद्धर्माचरणाची उदात्त शिकवण देण्याच्या व्रतापासून जरथुश्त्रास (इ.स.पू. ६ वे-७ वे शतक) परावृत्त करण्याचे त्याने प्रयत्न केले, पण ते सफल झाले नाहीत, असा उल्लेख  अवेस्ता  साहित्यात आढळतो. सैतानाशी त्याचे बरेच साम्य आहे. पहा : अहुर मज्द जरथुश्त्र, पारशी धर्म. तारापोर, जे. सी. (इं) सोनटक्के, ना. श्री. (म.)

अग्यारी : पारशी धर्मियांच्या अग्निमंदिराचे हे नाव आहे.

Image
  अग्यारी   : पारशी धर्मियांच्या अग्निमंदिराचे हे नाव आहे. ‘आतश्-ए-दादगाह,’ ‘आतश्-ए-आदराँन’ व ‘आतश्-ए-बेहराम’ असे अग्यरीचे तीन दर्जे आहेत. ‘आतश्-ए-दादगाह’ मधील अग्नीजवळ पूजेसाठी ⇨   दस्तुर   (पुरोहित) किंवा गृहस्थी जाऊ शकतो परंतु ‘आतश्-ए-आदराँन’ व ‘आतश्-ए-बेहराम’ मधील अग्नीजवळ सेवानियुक्त दस्तुराखेरीज अन्य कोणासही जाण्याचा अधिकार नाही. अग्यारीतील अग्नीचे दर्शन अन्य धर्मियांस घेता येत नाही. अग्यारीचे प्रवेशद्वार सोनार, लोहार, कुंभार इत्यादिकांच्या भट्टयांतील अग्नी एकत्र करून त्यावर धार्मिक विधी झाल्यावर प्याल्यासारख्या मूल्यवान धातुपात्रात आतश्-ए-आदरॉंन व आतश्-ए-बेहराममधील सिद्धग्नी स्थापिला जातो. विशेषत: आतश्-ए- बेहराममधील सिद्धग्नीत वैद्युताग्नी समाविष्ट असतो. आतश्-ए- बेहराम हे अग्नीमंदिर सर्वश्रेष्ठ होय. या मंदिरातील अग्नी विझला, तर ते अरिष्टसूचक चिन्ह मानले जाते. तारापोर, जे.सी. (इं.) सोनटक्के, ना.श्री. (म.)